महाराष्ट्र

maharashtra

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची राजस्थानात मोठी घोषणा; जयपूर ते दिल्ली दरम्यान धावणार इलेक्ट्रिकल केबल बस

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 5:56 PM IST

Nitin Gadkari in Rajasthan : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जयपूर ते दिल्ली दरम्यान इलेक्ट्रिकल केबल बस चालवण्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी जयपूरच्या दौऱ्यावर असताना केली आहे.

Nitin Gadkari in Rajasthan
Nitin Gadkari in Rajasthan

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

उदयपूर Nitin Gadkari in Rajasthan : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह उदयपूरच्या दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी राजस्थानतच्या जनतेला अनेक गिफ्ट देत 17 रस्त्यांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. या विकासकामासाठी सुमारे 2500 कोटी रुपये खर्च येणार आहेत. तसंच दाबोक येथील रुपी रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, "उदयपूर बायपासच्या कामात अनेक अडचणी होत्या. मात्र सततच्या प्रयत्नांमुळं हे काम अखेर पूर्ण झालं."

जोधपूरमध्ये रिंगरोडचं काम लवकरच पूर्ण होणार : या कार्यक्रमात बोलाताना गडकरी म्हणाले की, "वसुंधरा राजे राजस्थानच्या मुख्यमंत्री असताना जयपूरमधील रिंगरोडचं काम रखडलं होतं. विमानतळावरील एका छोट्या गेस्ट हाऊसमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. त्या चर्चेत हे काम शक्य आहे. ते पूर्ण होऊ शकते असं सांगण्यात आलं. मी हे काम पूर्ण होईल असंही सांगितलं होतं."

जयपूर ते दिल्ली दरम्यान धावणार इलेक्ट्रिकल केबल बस : या क्रार्यक्रमात नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केलीय. ते म्हणाले, "दिल्ली ते मुंबई दरम्यानचा एक्सप्रेस वे आम्ही ते जयपूरला जोडत आहोत. एवढंच नाही तर येत्या काही दिवसांत जयपूर ते दिल्ली दरम्यान इलेक्ट्रिक केबलच्या माध्यमातून बसस धावणार आहेत." तसंच आमचा हा पहिलाच प्रयोग असल्याचं त्यांनी सांगितलं. या बसमध्ये एअर कंडिशन बिझनेस क्लासच्या विमानासारख्या सुविधा असतील. या बसचं तिकीट दर हे डिझेल बसपेक्षा 30 टक्क्यांनी कमी असेल.

झेकोस्लोव्हाकियामधून आली आयडिया : "काही दिवसांपूर्वी आपण झेकोस्लोव्हाकियाला गेलो होतो. तिथं केबलच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावत असल्याचं पाहिलं. अशा स्थितीत अशा बसेस रस्त्यावर चालवण्याचा विचारही आपण केला. आता दिल्ली ते जयपूर दरम्यान इलेक्ट्रिक बस चालवल्या जातील. त्यासाठी रस्त्यावर रेल्वे ट्रॅकप्रमाणे केबल टाकण्यात येणार" असल्याचं यावेळी गडकरींनी सांगितलं.

कोणत्या कामांचं केलं उद्घाटन : आज राजस्थानात नितीन गडकरींनी 1100 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 93 किमी चित्तोडगड-उदयपूर विभागाच्या 6 लेन, 206 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 44 किमी बेवार-असिंद सेक्शनच्या पक्क्या खांद्याच्या 2 लेन, 186 कोटी रुपयांत 43 किमी असिंद-मंडल सेक्शनचे 2 लेन, 14 कोटी रुपये खर्चून 16 किमी भामरासिया ते मोदी-कुराबाद रस्ता आदी कामांचं उद्घाटन करण्यात आलंय.

हेही वाचा :

  1. विकासाचं विकेंद्रीकरण करणं हा ‘अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ’चा उद्देश– नितीन गडकरी
  2. कोणाला आरक्षण दिलं पाहिजे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

ABOUT THE AUTHOR

...view details