महाराष्ट्र

maharashtra

तीन दशकं दहशत माजवणाऱ्या गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृतदेह 'सुपुर्द-ए-खाक'; समर्थकांची मोठी गर्दी - Mukhtar Ansari Death

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 11:57 AM IST

Updated : Mar 30, 2024, 2:11 PM IST

Mukhtar Ansari Death : गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृतदेह 'सुपुर्द-ए-खाक' करण्यात आलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळं पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Etv Bharat
Etv Bharat

तीन दशकं दहशत माजवणाऱ्या गॅगस्टर मुख्तार अन्सारीचा मृतदेह 'सुपुर्द-ए-खाक'

गाझीपूर Mukhtar Ansari Death :गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा मृतदेह 'नमाज-ए-जनाजा'नंतर त्याच्या आई-वडिलांच्या कबरीशेजारी 'सुपुर्द-ए-खाक' करण्यात आलाय. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. तसंच कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी त्याच्या समर्थकांकडून मुख्तार अन्सारी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

गुरुवारी रात्री झाला होता मृत्यू : बांदा तुरुंगात बंदिस्त गँगस्टर मुख्तार अन्सारीला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला बांदा मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. यादरम्यान रात्री 10.30 च्या सुमारास डॉक्टरांनी मुख्तारला मृत घोषित केलं होतं. यानंतर डीजीपी प्रशांत कुमार यांनी गाझीपूर, मऊसह पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट घोषित केला.

मध्यरात्री मृतदेह घरी दाखल : जेलचे डीजी एसएन सबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माफिया मुख्तार अन्सारी रोजा ठेवत होता आणि गुरुवारी रोजा सोडल्यानंतर त्याची तब्येत बिघडली." दरम्यान, शुक्रवारी बांदा येथील वैद्यकीय महाविद्यालयात मुख्तारच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह घेऊन रुग्णवाहिका गाझीपूरकडे रवाना झाली. रात्री दीडच्या सुमारास रुग्णवाहिका मृतदेह घेऊन गाझीपूर येथील मुख्तारच्या घरी पोहोचली. यावेळी त्याच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सिबगतुल्लाह आणि अफजल अन्सारी हे मोठे भाऊही उपस्थित होते. आज सकाळी साडेदहा वाजता मुख्तारची अंत्ययात्रा घरातून निघाली. 11 वाजण्याच्या सुमारास मुख्तारचं पार्थिव 'सुपुर्द-ए-खाक' करण्यात आलं.

मोठा मुलगा अनुपस्थित :14 फेब्रुवारी 2023 पासून कासगंज तुरुंगात बंद असलेला मुख्तार अन्सारी याचा मोठा मुलगा अब्बास अन्सारी वडिलांच्या मृत्यूच्या बातमीने रडला. वडिलांच्या 'सुपुर्द-ए-खाक' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याचा पॅरोल अर्ज न्यायालयात दाखल होऊ शकला नाही.

हेही वाचा :

  1. गँगस्टर मुख्तार अन्सारीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन - Gangster Mukhtar Ansari passed away
  2. स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या आजोबांचा नातू ते कुविख्यात गुंड, मुख्तार अन्सारीची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? - Mukhtar Ansari News
  3. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधकांकडून मागणी, उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांचा हाय अलर्ट - mukhtar ansari death update
Last Updated :Mar 30, 2024, 2:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details