महाराष्ट्र

maharashtra

ट्रक आणि रिक्षाची भीषण धडक; 9 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 11:25 AM IST

Lakhisarai Road Accident : ट्रक आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना बिहारमधील लखीसराय इथं मंगळवारी मध्यरात्री घडली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती लखीसराय इथल्या रुग्णालयाचे डॉक्टर राजकुमार यांनी दिली आहे.

Lakhisarai Road Accident
घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी

पाटणा Lakhisarai Road Accident : ट्रक आणि रिक्षामध्ये झालेल्या जोरदार अपघातात तब्बल 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील झुलौना इथं राष्ट्रीय महामार्ग 30 वर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्यानं त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर स्थानिक नागरिकांसह प्रशासनानं तत्काळ बचावकार्याला सुरुवात केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आम्ही रेल्वे स्थानकात गस्तीवर होतो. यावेळी लखीसराय जिल्ह्यातील झुलौना इथं ट्रक आणि रिक्षाच्या भीषण अपघाताची माहिती मिळाली. आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे. - अमित कुमार, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे

ट्रक आणि रिक्षाचा समोरासमोर अपघात :लखीसराय सिकंदरा महामार्गावर रिक्षामधून प्रवासी जात होते. यावेळी ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. हा अपघात रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या झुलौना गावाजवळ मध्यरात्री घडला. अपघात झाल्याची माहिती मिळताच रामगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. घटनास्थळावर 8 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर एका जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिक्षात होते तब्बल 14 प्रवासी :ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या रिक्षात तब्बल 14 प्रवाशी बसले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यातील 8 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका प्रवाशाचा मृत्यू रुग्णालयात झाला. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षाचालक मनोज कुमार याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

जखमींची प्रकृती नाजूक :लखीसराय जिल्ह्यातील महिसोना इथला मनोज कुमार हा रिक्षातून प्रवासी घेऊन जात होता. यावेळी हा भीषण अपघात झाला. "ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या पाच जखमींना पाटणा इथं उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे," अशी माहिती डॉक्टर राजकुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा :

क्रिकेट सामना जिंकण्यापूर्वीच मृत्यूनं हरवलं; अमरावतीजवळील अपघातात चार तरुण क्रिकेटर जागीच ठार

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात; पुण्यातील दोन वकील जागीच ठार

ABOUT THE AUTHOR

...view details