महाराष्ट्र

maharashtra

सुनावणीच्या आधीच केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयातून ईडीच्या अटकेविरोधातील याचिका घेतली मागे - ED Arrested CM Kejriwal

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 1:12 PM IST

Updated : Mar 22, 2024, 1:59 PM IST

ED Arrested CM Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही याचिका मागं घेतलीय.

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली ED Arrested CM Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सुनावणी सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच मागं घेतलीय. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाला ही माहिती दिली. ते म्हणाले की, केजरीवाल यांच्या कोठडीबाबत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही इथून याचिका मागं घेत आहोत, म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही. खुद्द अभिषेक मनु सिंघवी यांनी याला दुजोरा दिलाय.

ईडी करणार कोर्टात हजर : दुसरीकडे, कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केलं जाऊ शकतं. या प्रकरणी ईडी आज केजरीवाल यांना हजर करणार असून कोठडीची मागणी करू शकते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीतील निदर्शनं पाहता, ईडी केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करु शकते.

दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण नाही : अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च गुरुवार रोजी दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण न मिळाल्यानं ईडीनं दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली. आज दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही या प्रकरणी हजर करण्यात येणार असून, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे.

आपकडून ठिकठिकाणी आंदोलन : दुसरीकडं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानं आम आदमी पक्षाच्या वतीनं गुरुवारी रात्रीपासून देशभरात ठिकठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन निदर्शनं करण्यात येत आहेत. तसंच विरोधी पक्ष त्यांच्या अटकेवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

हेही वाचा :

  1. केजरीवाल एक विचार असल्यानं कैद करता येत नाही, पंतप्रधान घाबरतात- आप महाराष्ट्राच्या सचिवांची टीका - ED arrested CM Kejriwal
  2. देशाच्या इतिहासात प्रथमच, मुख्यमंत्री केजरीवालांच्या अटकेनंतर तुरुंगातून चालणार दिल्ली सरकारचा कारभार - ED arrested CM Kejriwal
Last Updated :Mar 22, 2024, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details