महाराष्ट्र

maharashtra

झारसुगुडा बोट अपघात: ओडिशात बोट उलटून सात प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Jharsuguda Boat Mishap

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 2:03 PM IST

Updated : Apr 20, 2024, 2:14 PM IST

Jharsuguda Boat Mishap : झारसुगुडा इथल्या महानदीत बोट उलटून सात नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत अद्यापही काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Jharsuguda Boat Mishap
घटनास्थळावर नागरिकांचा आक्रोश

भुवनेश्वर Jharsuguda Boat Mishap : ओडिशामधील झारसुगुडा इथल्या महानदीत बोट उलटून 7 नागरिकांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या नावेत 50 प्रवासी अंबावोना इथून पाथरसेनीला जात होते. यावेळी हा अपघात घडला. मच्छिमारांनी 40 ते 45 नागरिकांना जीवदान दिल्यानं या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. काही प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बचाव पथकानं सात प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले असून इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे.

नाव उलटून सात प्रवाशांचा मृत्यू :झारसुगुडा इथल्या महानदीत बोट उलटून मोठा अपघात झाला आहे. महानदीतून पाथरसेनीला जाणाऱ्या प्रवाशांची बोट महानदीत उलटली. या नावेतून 50 पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. बोट उलटल्यानं तब्बल सात प्रवाशांचा बळी गेला आहे. बोट उलटून प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं घटनास्थळावर नागरिकांचा मोठा आक्रोश झाला.

मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त :झारसुगुडा इथं घडलेल्या अपघातात सात नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी झारसुगुडा अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयाची मदत जाहीर केली. यासह त्यांनी बचावकार्याला गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

बेपत्ता नागरिकांचा घेण्यात येत आहे शोध :बोट उलटून झालेल्या अपघातात अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. या बेपत्ता नागरिकांचा महानदीत बचाव पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. बचाव पथकातील रक्षकांकडून अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीनं पाण्याखाली बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे बेपत्ता नागरिकांना लवकरच शोधून काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

Last Updated :Apr 20, 2024, 2:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details