महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानी सौंदर्यवतीच्या जाळ्यात अडकला आर्मी कॅन्टीन ऑपरेटर, सैन्यदलाची गुप्त माहिती केली लीक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 10:37 PM IST

canteen manager honey trapped by ISI : आर्मी परिसरातील ओला कॅन्टीन ऑपरेटरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तो पाक महिला हँडलरला भारताची काही महत्वाची माहिती पाठवत असल्याचं समोर आलं आहे.

ISI agents leak indian army intelligence information
फोटो

बिकानेर /राजस्थान :Canteen Manager Honey Trapped by ISI : राजस्थान इंटेलिजन्सनं सैन्यदलाच्या गुप्तचर विभागासह बिकानेरच्या संयुक्त कारवाईत आज मंगळवार (दि. 27 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणाला अटक केली. आरोपी महिला पाक हँडलरला संवेदनशील माहिती पाठवत होता. अटक आरोपी महाजन हा आर्मी परिसरात ओला कँटीन ऑपरेटर आहे.

पाकिस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात : एडीजी (इंटेलिजन्स) संजय अग्रवाल यांनी सांगितलं की, "अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम सिंह (31) हा बिकानेरच्या डुंगरगड तहसीलमधील लखासर भागातील अप्पर का बस गावचा रहिवासी आहे. राजस्थान इंटेलिजन्स ही पाकिस्तानी गुप्तचर संस्थांकडून होणाऱ्या हेरगिरीच्या कारवायांवर नजर ठेवते. बिकानेरच्या डुंगरगढ भागात राहणारा विक्रम सिंह सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत पाकिस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे."

पाक गुप्तचर एजंटशी एक वर्ष संपर्क होता : इंटेलिजन्स जयपूर टीमने विक्रम सिंगच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्याला हनीट्रॅपचं आमिष दाखवलं जात होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी महिला एजंट्सच्या संपर्कात राहून सामरिक महत्त्वाची माहिती दिली जात असल्याचंही समोर आलं आहे. तसंच, आरोपी विक्रम सिंह हा आर्मी एरिया महाजन बिकानेर येथे अनेक दिवसांपासून व्हेंट कॅन्टीन चालवत होता. हा पाकिस्तानी गुप्तहेर सुमारे वर्षभर अनिताच्या संपर्कात होता.

पोलिसांकडून कसून चौकशी : पाक हँडलरच्या इच्छेनुसार, विक्रम हा सैन्यदलाच्या क्षेत्राची संवेदनशील माहिती, प्रतिबंधित क्षेत्रांचे छायाचित्र, स्थान आणि व्हिडिओ आणि युनिट्स आणि अधिकाऱ्यांची माहिती सोशल मीडियावर उपलब्ध करून देत होता. आरोपी विक्रम सिंह याची चौकशी सुरू आहे. तसंच, या प्रकरणात याच्यासह इतर कुणाचा संपर्क आहे का ? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details