महाराष्ट्र

maharashtra

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' जमावानं अडवली, मोदी-मोदीच्या घोषणा, फ्लाइंग किसनं उत्तर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 6:59 PM IST

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' जमावानं अडवली. यावेळी जमावानं मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. याला राहुल गांधींनी फ्लाइंग किस देऊन उत्तर दिलं.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra

गुवाहाटी Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये आहे. दरम्यान, राज्यातील सोनितपूर जिल्ह्यात जमावानं राहुल गांधी यांची बस अडवली. यावेळी उपस्थित लोकांन मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. हे पाहून राहुल गांधी बसमधून खाली उतरले. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना परत बसमध्ये बसण्यास सांगितलं.

सोशल मीडिया टीमच्या सदस्यांना मारहाण : गर्दीतल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीचे झेंडे हातात धरले होते. काही लोक राहुल गांधींच्या बससमोरही आले. यात्रेला कव्हर करणार्‍या व्लॉगरचा कॅमेरा, बिल्ला आणि इतर उपकरणं हिसकावून घेतल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. "पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्यांनाही मारहाण करण्यात आली. आम्ही पोलिसांना कळवलं असून अतिरिक्त पोलिस अधीक्षक सध्या घटनास्थळी आहेत", असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केलं की, प्रेमाचं दुकान सर्वांसाठी खुलं आहे. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केलाय.

जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला : सोनितपूरमध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या कॅमेरा क्रूवर हल्ला झाल्याचा दावा पक्षानं केला आहे. "सोनितपूरमधील जुमुगुरीघाट येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बेशिस्त जमावानं माझ्या कारवर हल्ला केला. त्यांनी विंडशील्डवरील भारत जोडो न्याय यात्रेचं स्टिकरही फाडलं. त्यांनी पाणी फेकलं आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या. मात्र आम्ही शांतता राखली आणि वेगानं पुढे सरकलो", असं जयराम रमेश यांनी सांगितलं.

आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप : "हे सर्व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा घडवून आणत आहेत", असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. मात्र, "आम्ही घाबरणार नाही, लढत राहू", असं ते म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये गुन्हा; भाजपाकडून यात्रा उधळण्याचा कट असल्याचा कॉंग्रेसचा आरोप
  2. "मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही, मला त्यात रस नाही", अयोध्या वादावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details