महाराष्ट्र

maharashtra

Assembly By Elections : लोकसभेबरोबरच 26 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक; महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 9:10 PM IST

Updated : Mar 16, 2024, 9:25 PM IST

Assembly By Election 2024 Dates : लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. 26 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे.

Assembly Election 2024 Dates Bypolls
Assembly Election 2024 Dates Bypolls

मुंबई Assembly By Election 2024 Dates : लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीसोबतच 26 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील अकोला मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. तेथील भाजपा आमदारांचं निधन झाल्यानं पोटनिवडणूक लागली आहे.

या राज्यांमध्ये पोट निवडणूक : बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक तसंच तामिळनाडूमध्ये विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत 97 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असून, लोकशाहीच्या या महान उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं आहे. तसंच निवडणूक आयोग देशभरात 10.5 लाख मतदान केंद्रे स्थापन करण्याची तयारी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. 26 एप्रिल रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. त्या जागेवर आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

देशात 97 कोटी नोंदणीकृत मतदार : "देशात 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. निवडणुकीसाठी 1.5 कोटी कर्मचाऱ्यांमार्फत 10.5 लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यासाठी 55 लाख ईव्हीएम मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोगानं आतापर्यंत 17 लोकसभा निवडणुका, 16 राष्ट्रपती निवडणुका तसंच 400 हून अधिक विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत. देशात 97.8 कोटी पात्र मतदार असून त्यापैकी 49.72 कोटी पुरुष तसंच 47.1 कोटी महिला मतदार आहेत," असं नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.

निवडणुका शांततापूर्ण : "प्रथमच मतदान करणारे 1.82 कोटी मतदार आहेत. गेल्या 11 राज्यांच्या निवडणुका शांततापूर्ण तसंच हिंसामुक्त झाल्या आहेत. त्याचवेळी जवळपास शून्य फेरमतदान झालंय. भविष्यात त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार आहे," असं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यात मतदान झालं होतं. त्यावेळी एकूण 91.2 कोटी पात्र मतदार होते, त्यापैकी सुमारे 43.8 कोटी महिला मतदार तसंच सुमारे 47.3 कोटी पुरुष मतदार होते.

आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक प्रसंग : गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांपैकी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) 303, काँग्रेस 52, तृणमूल काँग्रेसनं 22 जागा जिंकल्या होत्या. पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले, "आम्ही पूर्णपणे तयार आहोत, मी मतदारांना मतदानात सहभागी होण्याची विनंती करतो. आपल्या सर्वांसाठी हा ऐतिहासिक प्रसंग आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रीय निवडणुकांचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढेल. सर्व राज्यांतील परिस्थितीचं आकलन केल्यानंतर, निष्पक्ष निवडणूक होतील असा आम्हाला विश्वास वाटतो."

हे वचालंत का :

  1. Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; देशात सात टप्प्यात मतदान, 4 जून रोजी निकाल
  2. Lok Sabha Elections : महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
  3. लोकसभा निवडणूक जाहीर, देशात आचारसंहिता लागू; जाणून घ्या आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?
Last Updated :Mar 16, 2024, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details