महाराष्ट्र

maharashtra

मला 6 वर्षे नको, 14 वर्षांसाठी हद्दपार करा-काँग्रेसमधील हकालपट्टीनंतर आचार्य प्रमोद कृष्णम यांची आगपाखड

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 10:14 PM IST

Updated : Feb 11, 2024, 10:21 PM IST

Acharya Pramod Krishnam : काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना त्यांच्या वक्तव्यांनी फटकारलं. ते म्हणाले की, अपमानाचा घोट घेतल्यानंतर सचिन पायलट हे राहुलसोबत न्यायासाठी प्रवास करत आहेत.

Acharya Pramod Krishnam criticism
आचार्य प्रमोद कृष्णम यांची टीका

रायपूर/दिल्ली Acharya Pramod Krishnam : काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आचार्य प्रमोद कृष्णम काँग्रेसवर पूर्णपणे नाराज आहेत. (Priyanka Gandhi) राहुल गांधींवर टीका करत आचार्य म्हणाले की, प्रियंका गांधी राहुलच्या मोठ्या न्याय मोर्चात सामील न होण्याचं कारण काय? सचिन पायलट हे राहुल गांधींच्या प्रवासात नक्कीच सोबत आहेत. पण अपमानाचा घोट घेऊन प्रवासात सामील होत आहे. राम आणि राष्ट्राच्या नावावर मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं आचार्य म्हणाले.

राम आणि राष्ट्राशी तडजोड होऊ शकत नाही. माझी इच्छा आहे की, मला 6 वर्षांच्या ऐवजी 14 वर्षांसाठी हद्दपार करावं. कारण प्रभू राम देखील 14 वर्षांसाठी वनवासात गेले होते. काल रात्री अनेक माध्यमांतून मला कळले की, काँग्रेस पक्षानं एक पत्र जारी केलं आहे. त्यांच्या बाजूनं केसी वेणुगोपाल यांनी पत्रात म्हटलं आहे की, पक्षविरोधी कारवायांमुळे माझी हकालपट्टी करण्यात आली आहे. मला पक्षातून मुक्त केल्याबद्दल सर्वप्रथम मी काँग्रेस नेतृत्वाचं आभार मानतो. यासोबतच मला त्यांना विचारायचं आहे की, कोणत्या कामांमुळं माझी हकालपट्टी झाली - आचार्य प्रमोद कृष्णम, माजी काँग्रेस नेते

काँग्रेसवर सतत हल्ले : आचार्य प्रमोद कृष्णम हे गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसवर टीका करत होते. अनेक जण वादविवादात आणि सार्वजनिक ठिकाणी काँग्रेसवर हल्ला करण्यापासून मागे हटत नव्हते. अनेक वेळा ते राहुल गांधींबाबत कठोर भूमिका घेताना दिसले. काँग्रेसनं हकालपट्टी केल्यानंतर, एकेकाळी टीम प्रियंकाचा भाग असलेल्या आचार्य यांनी संपूर्ण काँग्रेस टीमवर निशाणा साधला.

पण त्यांनीच माझी हकालपट्टी केली : कलम 370 हटवल्याच्या निषेधार्थ माझाही सहभाग होता का? जेव्हा द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली तेव्हा काँग्रेसनं त्यांचं समर्थन करायला नको होतं. मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की, राम आणि राष्ट्र यांच्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये. आज मी मोकळा आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मला वचन दिलं होतं की, ते मरेपर्यंत काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत. पण त्यांनीच माझी हकालपट्टी केली. त्यामुळे आता मी मुक्त आहे. मला खूप अपमान सहन करावा लागला. तरीही मी पक्ष सोडला नाही. मी राजीव गांधींना दिलेलं वचन आड येत राहिलं. त्यामुळे मी पक्ष सोडला नाही. गुलाम आझादांपासून कमलनाथ, भूपेंद्रसिंग हुड्डा ते दिग्विजय सिंह आणि आनंद शर्मा यांच्यापर्यंत आजोबांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लोकांचा आदर कसा करायचा राहुल गांधींना कळत नाही. हे लोक इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत होते. याच लोकांनी राहुल गांधींचा हात धरून त्यांना चालायला शिकवले, असंही आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.

प्रमोद कृष्णम भाजपात जाणार का?काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधत आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, ते फक्त रबर स्टॅम्प आहेत. प्रियंका गांधी यांना न्याय यात्रेपासून दूर का ठेवण्यात आलं आहे, हे राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसनं स्पष्ट करावं. मला अभिमान आहे की, मी पंतप्रधान मोदींना कलकीधाममधील कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहे. पंतप्रधानांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मान्य करून आनंद वाढविला. भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर आचार्य म्हणाले की, मी कधी आणि कुठे जायचं हे माझा देवच ठरवेल. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.

हेही वाचा:

  1. भाजपासाठी सत्तांतर हाच धर्म, हुकूमशाहीपासून वाचविण्याकरिता सर्व समाजासह धर्मांनी एकत्र यावे-उद्धव ठाकरे
  2. एका लाईनीत उभं करून सर्वांना भारतरत्न पुरस्कार द्या, सुशीलकुमार शिंदेंचा केंद्र सरकारला उपहासात्मक टोला
  3. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतरत्नचे वाटप, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
Last Updated :Feb 11, 2024, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details