महाराष्ट्र

maharashtra

फडणवीस यांच्या पुढाकाराने अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उत्थान

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 5:14 PM IST

महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला विकासाची गती देण्यासाठी अनेक उल्लेखनीय कामे केली.प्रश्न मग तो राज्याच्या विकासाचा असो किंवा मराठ्यांच्या सन्मानाचा... फडणवीस ‘देवदूत’ म्हणून कोणताही लोभ किंवा मोह न बाळगता मराठी माणसांच्या पाठीशी कायम उभे राहिले.

Thumbnail
Thumbnail

महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला विकासाची गती देण्यासाठी अनेक उल्लेखनीय कामे केली.प्रश्न मग तो राज्याच्या विकासाचा असो किंवा मराठ्यांच्या सन्मानाचा... फडणवीस ‘देवदूत’ म्हणून कोणताही लोभ किंवा मोह न बाळगता मराठी माणसांच्या पाठीशी कायम उभे राहिले. त्यांच्या पुढाकाराने मागील सरकारमधील मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात आरक्षणासाठी दीर्घकाळ आंदोलन करणाऱ्या तरुणांचे आंदोलन थांबविण्यासाठी अनेक फायदेशीर योजना सुरू केल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सन २०१६ मध्ये मागील सरकारच्या मंत्रिमंडळाने आर्थिक मागास प्रवर्गातील (ईबीसी) विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे काम सुरू केले. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या ईबीसी विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचे निकष एक लाख रुपयांवरून अडीच लाख रुपये करण्यात आले आहेत.

याशिवाय इतरही अनेक उपक्रम हाती घेण्यात आले.जा अन्वये, या प्रवर्गातून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक सवलती देण्यात आल्या.ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे,कौटुंबिक अडचणींमुळे अभ्यासात अनेक अडथळे येतात,तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी आहे,अशा गरजू विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रतिपूर्ती योजनेंतर्गत शासनाने शिक्षणासाठी वर्षानुवर्षे खर्च होणाऱ्या शुल्काच्या ५० टक्के रक्कम भरण्याची तरतूद केली.याचे निर्विवाद श्रेयही मराठा समाजाच्या हक्कांसाठी दीर्घकाळ लढा देणारे ‘लोकसेवक’ फडणवीस यांना जाते.काँग्रेस सरकारने मराठ्यांच्या सन्मानाशी केवळ खेळ केला आहे, तर फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांना प्रेरणास्थान मानून त्यांचे त्याग आणि चिकाटी या गुणांचा अंगीकार करुन महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details