महाराष्ट्र

maharashtra

Minister Smriti Irani Pune : 'काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षाला पराभूत केल्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे माझ्यावर राग'

By

Published : May 16, 2022, 8:31 PM IST

पुणे - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज ( सोमवारी ) पुणे दौऱ्यावर असताना महागाई विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ( Congress and NCP Agitation Pune ) इराणी यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. 2014 साली काँग्रेसचे गड समजल्या जाणाऱ्या अमेठी येथून निवडणूक लढविण्याचा विचार मी केला. 2019 साली भाजपाने अशा प्रकारे निवडणूक लढवली की काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना आपले गड अमेठी सोडून दुसरी जागा शोधावी लागली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच माझ्यावर नाराज होणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे काँग्रेसपासून तयार झालेल पक्ष आहे. त्यामुळे त्यांचे देखील माझ्याप्रती आक्रमकपणा दाखवणे हे स्वाभाविक आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना पहिल्यांदा हरवले. त्यामुळे त्यांना हे दुःख आहे की भाजपाच्या एका साध्या कार्यकर्त्याने त्यांना हरवले. म्हणून ते विरोध करत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Union Minister Smriti Irani ) यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details