महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Chaturthi 2022: केरळ मधील नादब्रम्ह कलावेधी संस्थेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर सादर करण्यात आले चंडा

By

Published : Sep 9, 2022, 6:12 PM IST

पुणे - पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची ( Ganeshotsav 2022 ) सांगता यंदा धूमधडाक्यात होणार असून थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे. केरळ मधील नादब्रम्ह कलावेधी या संस्थेच्या वतीने आज सकाळी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर चमंडा ताल हा वाद्य प्रकार ( Naadbramha Performance ) गणपतीला सादर करण्यात आला. हे असुर वाद्य असून याच्या ताल वादनाने मंदिरातील वातावरण मंत्रमुग्ध आणि प्रसन्न झाले. हे वाद्य फक्त देवाच्या समोर वाजवण्यास परवानगी असते अशी आख्यायिका असून येणाऱ्या भाविकांना या वादनाने आनंददायी ऊर्जा मिळाली.चंडा ताल हा या वादनाचा प्रकार आहे हे तालावर वाजणारे वाद्य आहे. अस यावेळी नादब्रह्म कलावेधी चे लतिश पुटटत्ता यांनी सांगितल.

ABOUT THE AUTHOR

...view details