महाराष्ट्र

maharashtra

Video: कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, पाणीपुरवठा बंद

By

Published : May 13, 2022, 10:29 AM IST

()
कोल्हापूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रातील पाईपलाईन आज सकाळी पुन्हा एकदा फुटली ( Kolhapur water supply pipeline burst ) आहे. कालच एक गळती थांबविण्यात आली होती मात्र आज सकाळी पुन्हा एकदा बालिंगा उपसा केंद्र ते चंबुखडी दरम्यान असणाऱ्या मुख्य पाईपलाईनला पुन्हा गळती लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून पाइपलाइनच्या आजूबाजूस असलेल्या शेतामध्ये सर्वत्र पाणी पसरले आहे. पाण्याची पाईपलाईन फुटल्याने तब्बल 35 फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. असता फोन बंद लागत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करून सततची पाणी गळती थांबवावी तसेच आमच्या शेताची झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे मात्र या पाइपलाइनच्या गळतीचे प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details