महाराष्ट्र

maharashtra

Shivsena शिवसेनेचे चिन्ह गोठविले, पहा काय म्हणाले घटनातज्ञ उल्हास बापट

By

Published : Oct 9, 2022, 11:35 AM IST

पुणे निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटातील पक्ष चिन्हाबाबत Party symbol of Shiv Sena and Shinde group शनिवारी निर्णय दिला आहे. आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. दोन्ही गटांना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही, यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की हे जे आयोगाने निर्णय दिला आहे तो शेवटचा अंतरिम निर्णय येऊ पर्यंत निर्णय दिला आहे. हा निर्णय फक्त अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नव्हे तर अंतरिम आदेश येई पर्यंत ज्या ज्या निवडणुका होतील त्यात हे चिन्ह वापरता येणार नाही, असे यावेळी बापट म्हणाले. एकूणच कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय म्हणाले उल्हास बापट Constitutional expert Ulhas Bapat पाहा.

ABOUT THE AUTHOR

...view details