महाराष्ट्र

maharashtra

शिस्तीसाठीच निलंबन, नाहीतर सदनात दंगली होतील - संजय राऊत

By

Published : Jul 6, 2021, 11:02 AM IST

मुंबई : भाजपच्या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई होणे हा शिस्तीचा भाग आहे. नाहीतर सदनात दंगली होतील असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. भाजपच्या 12 आमदारांचं वागणं अतिशय चुकीचं होतं. ते वेलमध्ये गेले हे आम्ही पाहिलं आहे. तालिका सभेचे अध्यक्ष भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की, त्यांना धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली. सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे, ज्यामध्ये कोर्टाने नमूद केलं आहे की, आमदारांचं किंवा खासदारांचं आशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये. १२ आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग आहे. जर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील. जे आम्ही पाकिस्तानच्या सभागृहात पाहिलं आहे. बिहार, उत्तरप्रदेशच्या सभागृहात आम्ही हे पाहिलं आहे तिथं दंगली उसळल्या आहेत. महाराष्ट्रात अशी परंपरा पडू नये यासाठी आशा प्रकारचा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे राऊत म्हणाले. बेळगाव महापालिकेवर लाल-पिवळा झेंडा काल लावण्यात आला आहे असे विचारण्यात आल्यावर त्यांची पिवळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असेही राऊत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details