महाराष्ट्र

maharashtra

जालन्यात ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणासाठी 'रास्ता रोको'

By

Published : Jun 21, 2021, 5:18 PM IST

ओबीसी समाजाचे 27 टक्के राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुढाकाराने ओबीसी समाजातील सर्व जातीच्या नागरिकांनी आज (सोमवारी) अंबड चौफुली भागात रास्ता रोको आंदोलन केले. महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण 24 एप्रिल 1994 ला मंडल आयोग लागू झाल्यानंतर मिळाले होते आणि याचा फायदा 68 हजार समाज बांधवांना मिळाला. मात्र आता दिनांक 4 मार्च 2021 च्या उच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. केंद्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हे आरक्षण रद्द झाल्याचा ठपका ठेवून हे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. रास्ता रोकोमध्ये ओबीसी समाजाचे जिल्ह्यातील मान्यवर नेते उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गजानन गीते, राजेंद्र राख,आदींची उपस्थिती होते.

ABOUT THE AUTHOR

...view details