महाराष्ट्र

maharashtra

रायघोळ नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांची मानवी साखळी

By

Published : Jul 24, 2020, 6:25 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गावाजवळील रायघोळ नदीला मोठा पूर आला. पुलावरून पाणी वाहत असल्याने सायंकाळी घरी परतणाऱ्या शेतकरी व महिलांनी मानवी साखळी करून या पाण्यामधून मार्ग काढला. यादरम्यान एका महिला पाण्यात पाय घसरल्यामुळे वाहून चालली होती. गावातील दिपक मुठ्ठे या तरुणाने प्रसंगावधान राखत तिला पाण्यामधून बाहेर काढले.

ABOUT THE AUTHOR

...view details