महाराष्ट्र

maharashtra

'मी चांगल्या पदावर आहे, पण ते बघायला वडील नाही याची खंत वाटते', बच्चू कडूंनी आठवणींना दिला उजाळा

By

Published : Jun 20, 2021, 12:21 PM IST

अमरावती - मोठ्या संघर्षाच्या काळातून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. आता सर्व वैभव आहे, मी चांगल्या पदावर आहे. पण हे सर्व पाहण्यासाठी आमचे बापू म्हणजे आमचे वडील नाही याची खंत वाटते. फादर्स डेच्या निमित्ताने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज एक व्हिडिओ शेअर करत आई वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. ते खूप सेवाभावी होते आणि कायम लोकांची मदत करायचे, त्यांचा तोच मदतीचा गुण माझ्यात आला आहे, असे बच्चू कडू म्हणाले. या व्हिडिओत त्यांनी त्यांच्या वडिलांचे अनेक किस्से सांगितले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details