महाराष्ट्र

maharashtra

VIDEO: अनिल देशमुख यांच्या घरासमोर समर्थकांची गर्दी; घोषणाबाजीने वातावरण तापले

By

Published : Jul 18, 2021, 3:11 PM IST

Updated : Jul 18, 2021, 3:44 PM IST

नागपूर - १०० कोटी वसुली प्रकरणात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती सील केल्यानंतर पुन्हा ईडीने देशमुखांच्या विरोधात फास आवळला आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड येथील वडविहार निवासस्थानी ईडीच्या पथकाने धाड टाकून सर्च सुरू केला आहे. या कारवाईची माहिती देशमुख समर्थकांना समजताच, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकत्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली. ज्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे.
Last Updated :Jul 18, 2021, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details