महाराष्ट्र

maharashtra

अंगारकी चतुर्थी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

By

Published : Nov 23, 2021, 3:33 PM IST

पुणे - अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी (angarakhi chaturthi) दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना आहे. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने बाप्पाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. गेले दोन वर्ष कोरोनामुळे लोकांना अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेता आले नाही. मात्र, यंदा निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. कोरोनानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त आज गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेत आहेत. पहाटेपासूनच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांनी गर्दी केली. (shrimant dagdusheth halwai ganpati pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा...

ABOUT THE AUTHOR

...view details