महाराष्ट्र

maharashtra

ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर घरी आनंदाचे वातावरण, आईशी ईटीव्ही भारतने साधला संवाद

By

Published : Aug 7, 2021, 8:38 PM IST

हरियाणा (पानीपत) - भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेकमध्ये 87.58 मीटर फेकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक अथलेटिक्समधील भारताचे हे पहिले पदक आहे. तसेच, २००८ ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकलं होते. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. नीरजच्या या विजयानंतर त्याच्या घरी पानिपतमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. त्याच्या विजयानंतर त्याची आई आणि बहिणीने ईटीव्ही भारतशी बोलून आनंद व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details