महाराष्ट्र

maharashtra

Agitation For Water in Amravati : पाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ताचे 'शोले' स्टाईल आंदोलन; दर्यापूर शहरात खळबळ, पाहा व्हिडिओ

By

Published : Apr 8, 2022, 2:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली ( agitation by climbing on water tank ) होती. मात्र त्यावर उपाययोजना न केल्याने शोले चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉग सारखे आज (शुक्रवार) नकुल सोनटक्के यांनी दर्यापूर येथील जीवन प्राधिकरणाच्या टाकीवर चढून निषेध आंदोलनाला सुरुवात ( Social worker Sholay type agitation for water ) केली आहे. यामुळे दर्यापूर येथे खळबळ उडाली. पाण्याच्या टाकीवरुन युवक पडल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवन प्राधिकरणाच्या टाकीच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले असून नकुल सोनटक्के या युवकाची समजूत घालण्याचा प्रयत्न प्रशासनाच्यावतीने सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details