महाराष्ट्र

maharashtra

Freestyle Fighting at Railway Station: रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी... व्हिडिओ व्हायरल

By

Published : Aug 5, 2023, 12:37 PM IST

रेल्वे स्टेशनवर हाणामारी

पुणे : रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणे असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. आता तर चक्क पुण्यातून रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी होत असल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये हाणामारी करणार्‍या दोघांमधील एकजण दुसर्‍याला डोक्यापर्यंत उचलून-उचलून आपटत होता. खाली पडणार्‍या व्यक्तीचे डोके आपटल्याचा जोरजोरात आवाज येत होता. रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details