महाराष्ट्र

maharashtra

वाघिणीच्या डरकाळीनं कॉर्बेट पार्क हादरलं, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 1:47 PM IST

वाघिणीच्या डरकाळीनं कॉर्बेट पार्क हादरलं, पाहा व्हिडिओ

रामनगर Jim Corbett Park :जिम कॉर्बेट पार्क हे वन्यजीवांसाठी जगप्रसिद्ध आहे. वन्यजीव जवळून पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथं येतात. मात्र काहीवेळा वन्यप्राण्यांचे आक्रमक वर्तनही येथे पाहायला मिळतं. असंच काहीसं जिम कॉर्बेट पार्कच्या गर्जिया टुरिझम झोनमध्ये पाहायला मिळालं. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक वाघीण आक्रमकपणे पर्यटकांच्या जिप्सीच्या दिशेनं धावत येताना दिसत आहे. त्यामुळं सगळेच जण घाबरले.. त्यानंतर काही वेळानं वाघीण जंगलाच्या दिशेने निघून गेली. व्हिडिओसंदर्भात वन्यजीव प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक संजय छमल म्हणाले की, जेव्हा आपण जंगल सफारीवर असतो तेव्हा अनेक वेळा आपण वन्यजीवांच्या जवळून जातो. त्यामुळं वन्यप्राणी घाबरून पळून जातात. या व्हिडिओतही तेच दिसतंय. तसंच वन्यजीव पर्यटनात ही गोष्ट नवीन नाही.  ही सर्वसामान्य बाब आहे, असंही ते म्हणाले. 

(डिस्कलेमर- व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत पुष्टी देत नाही.)

ABOUT THE AUTHOR

...view details