महाराष्ट्र

maharashtra

Accident : मुंबई-गोवा महामार्गावर दोन बसची समोरासमोर धडक; ३ जण गंभीर जखमी

By

Published : Jun 29, 2023, 9:45 PM IST

Accident

नवी मुंबई :मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन बसची धडक होऊन भीषण अपघात झाला. महाराष्ट्र राज्य मंडळाची एसटी बस आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३ जण गंभीर जखमी :मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन बसच्या अपघातात एकूण १५ प्रवासी जखमी झाले असून ३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबधित अपघात हा पनवेल जवळील पळस्पे फाट्यानजीक असणाऱ्या साईकृपा हॉटेलसमोर झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिमंडळाची एसटी, जेएसडब्ल्यू कंपनीची बस यांची दुपारी समोरासमोर धडक झाली. सुदैवाने जीवितहानी नसल्याची माहिती :या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत, या अपघाताची, माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पनवेल शहर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details