महाराष्ट्र

maharashtra

चालत्या ट्रेनला चोर लटकला अन् प्रवासी मारहाण करत राहिले; नेमकं काय घडलं?

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 5:56 PM IST

Thief Hanging From Moving Train

भागलपूर (बिहार) Thief Hanging From Moving Train :बिहारच्या भागलपूरजवळ रेल्वेला लटकलेल्या चोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झालं असं की, रेल्वेमध्ये एक महिला फोनवर बोलत होती. तेव्हा अचानक एका चोरट्यानं तिची पर्स हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रेल्वेतील प्रवाशांनी चोराला पर्स चोरताना रंगेहात पकडलं. यानंतर चोर चालत्या ट्रेनच्या खिडकीला लटकत राहिला. या दरम्यान प्रवासी त्याला मारहाण करत राहिले. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केलं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'ईटीव्ही भारत' मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी करत नाही. पाहा हा व्हिडिओ. 

ABOUT THE AUTHOR

...view details