महाराष्ट्र

maharashtra

Terrible Accident : भरधाव स्कार्पिओने दोन मोटरसायकलींना उडवले, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 6, 2022, 11:56 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

Terrible Accident : कराड तालुक्यातील कार्वे गावात स्कार्पिओ चालकाने दोन मोटरसायकलींना धडक देऊन एका मोटरसायकलला 30 फूट फरफटत नेले आहे. या अपघातात मोटारसायकलवरील एक तरूण उडून मागे पडला, तर दुसरा मोटरसायकसह स्कार्पिओच्या बंपरखाली अडकल्याने फरफटत गेला. संतोष श्रीरंग थोरात आणि शिवाजी शंकर देसाई हे दोन तरूण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील स्कार्पिओ चालक कार्वे गावातीलच असून घटनेवेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातातील स्कार्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, रात्री 9:30 वाजेच्या सुमारास झालेला भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details