महाराष्ट्र

maharashtra

Sudhir Mungantiwar जयंतराव 3 महिन्यात सरकार पडून दाखवा; सुधीर मुनगंटीवार यांचे खुले आव्हान

By

Published : Nov 5, 2022, 8:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

नांदेड: Sudhir Mungantiwar On Jayantrao Patil आमदार अपात्रतेचा मुद्दा 16 आमदार अपात्र ठरणारच नाहीत, आमदार अपात्र होण्यालायक त्यांची कृती नाही. कायदेबाह्य जाऊन अपात्र करण्याचा प्रयत्न होता. पक्षाच्या बैठकीला VIP लागतच नाही. अपात्र होण्याबाबत हे दिवसा स्वप्न पाहत आहेत. खैरे यांना भीती वाटतेय की त्यांच्याकडे कुणी शिल्लक राहिल की, नाही त्यातून ते काहीही बोलतायत. मोदीजींचा देशभक्तीचा विचार पाहून अनेकजण आमच्याकडे आकर्षीत होत आहेत. सुषमा अंधारे यांचे फडणवीस यांच्यावरचे आरोप बिनबुडाचे, या आधी इतक्या सभा झाल्या, तेव्हा देवेंद्रजी आठवले नाहीत का, सभा नाकारण्याचा निर्णय स्थानिक पोलिसांचा होता. आदित्य ठाकरेंनी दडपशाहीचा केलेला आरोप हास्यास्पद आहे. भारत जोडो यात्रेनंतर भाजपला यश मिळतंय. त्यामुळे भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या राहूल गांधीचे आभार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक येत आहे. विरोधी पक्षाचे विखे पाटील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे सगळे भाजपमध्ये आले पंतप्रधान मोदी यांची देशभक्ती आहे. शिर्डी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरु आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले राष्ट्रवादीच शिबीर झाल्यावर महराष्ट्रात सत्ता बदल होतो, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांना आव्हान दिले. 3 महिन्यात सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान मुनगंटीवार यांनी दिले आहे.
Last Updated :Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details