महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar Banner: शरद पवार अन् अजित पवार एकाच बॅनरवर; ऐका काय म्हणतात स्थानिक नेते

By

Published : Aug 16, 2023, 7:54 PM IST

शरद पवार व अजित पवार बॅनर

बीड :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांची दुसरी सभा बीड शहरात होत आहे. शहरात होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. शरद पवार यांच्या होणाऱ्या सभेच्या अगोदरच बीड शहरात 'साहेब कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या' अशा आशयाचे बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लागल्याचे पाहायला मिळत आहेत. हे बॅनर अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी लावले आहेत. शहरातील माने कॉम्प्लेक्स या भागामध्ये शरद पवार यांच्या सभेची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे. तर शहरातील चौकात येणारा प्रत्येक माणूस या बॅनरकडे निरखून पाहात आहे. मात्र आता हे बॅनर अजित पवार गटाच्या उपाध्यक्ष अविनाश नायकुडे यांनी लावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच दरम्यान कार्यकर्त्यांनी बॅनर का लावले हेही स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details