महाराष्ट्र

maharashtra

ईडीला घाबरुन पळालेल्या पळपुट्या मुख्यमंत्र्यांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही-संजय राऊतांची सडकून टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 7:27 AM IST

Sanjay Raut on CM Eknath Shinde

सातारा Sanjay Raut on CM Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्लीचा गुलाम म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केलीय. मुख्यमंत्र्यांचं दीड वर्ष दिल्लीत मुजरा करण्यात गेल्याचा टोलाही त्यांना लगावलाय. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या सांत्वनासाठी खासदार संजय राऊत कराडला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यावर टीका करताना राऊत म्हणाले, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम झाले आहेत. ते ईडीला घाबरुन पळाले आहेत, अशा पळपुट्या मुख्यमंत्र्यांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही. या गुलाम माणसाची दीड वर्षे दिल्लीत मुजरा झाडण्यातच गेली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान, बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, आचरण यापैकी त्यांच्याकडं काय आहे?" तसंच उदयनराजे महायुतीचे नेते आहेत. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाशी त्यांनी इमान राखलं पाहिजे, अस म्हणत त्यांनी उदयनराजेंनाही टोला लगावलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details