महाराष्ट्र

maharashtra

Bacchu Kadu Warning Tendulkar : ऑनलाईन गेमची जाहिरात करुन सचिन तू चुकलास, जाहिरात करणे थांबवावे; अन्यथा... - बच्चू कडूंचा इशारा

By

Published : Aug 11, 2023, 3:48 PM IST

Updated : Aug 11, 2023, 3:58 PM IST

बच्चू कडू

अमरावती : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 'ऑनलाइन गेम'च्या जाहिरातीतून माघार घ्यावी, उलट त्याने त्याचा विरोध करावा. नाहीतर आंदोलन करू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 'ऑनलाइन गेम'मुळे अनेक लोकांना आत्महत्या कराव्या लागल्या. तेंडुलकरने जाहिरात बंद केली नाही तर यासाठी वकिलाची नियुक्ती करू. त्यासाठी न्यायालयात जाऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात बच्चू कडू विरुद्ध तेंडुलकर हा वाद पेटण्याची शक्यता आहे. 'भारतरत्न' पुरस्कार प्राप्त सचिन तेंडुलकर यांनी 'ऑनलाइन गेम'ची जाहिरात करणे चुकीचे आहे. या गेमच्या नादात खूप सार्‍या जणांचे जीव गेले आहेत. 'भारतरत्न' असलेल्या सचिन तेंडुलकरने याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. सचिन तेंडुलकर हे या भारताचे अभिमान आहेत. त्यांनी 'ऑनलाईन गेम'च्या जाहिरातीमधून माघार घ्यावी. अन्यथा सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. नागरिकांचे बळी घेणाऱ्या 'ऑनलाइन गेम'वर बंदी घालण्यासंदर्भात सचिन तेंडुलकर यांनी सुचवावे. असल्या गेमचा त्यांनी विरोध करावा. या गेमच्या भूमिकेबाबत सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण न दिल्यास वकिलाची नियुक्ती करून या प्रकरणामध्ये काय कारवाई करता येईल यासंदर्भात मत घेतले जाईल, असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Last Updated :Aug 11, 2023, 3:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details