महाराष्ट्र

maharashtra

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धेत धावले १३०० जण

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 12:28 PM IST

विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धा

अमरावती :स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री तथा घटना समितीचे सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. आमदार यशोमाती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विलास इंगोले यांच्यासह अन्य मान्यवर मान्यवरांनी या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी दिंडी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेल्या श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. डॉ. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. सर्व महिला व पुरुषांसाठी असलेली ही स्पर्धा एकंदर आठ गटात झाली असून प्रत्येक गटात एकूण सहा पुरस्कार याप्रमाणे एकूण दीड लक्ष रुपयांचे पुरस्कार विजेत्यांना वितरीत करण्यात आलेत.

ABOUT THE AUTHOR

...view details