महाराष्ट्र

maharashtra

नवी मुंबईत भीषण अपघात; एक ठार, तर दोघं गंभीर जखमी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 11:39 AM IST

नवी मुंबईत भीषण अपघात

नवी मुंबई Navi Mumbai accident :नवी मुंबईतील उलवे येथे एक कार आणि ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या  अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दोघं जणं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. याप्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी (23 नोव्हेंबर) मध्यरात्री उलवे जवळ हा अपघात झाला. एक कार उलवे येथून बेलापूरच्या दिशेनं जात असतानाच कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् ती कार समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ती कार पुढं जाऊन एका स्कूटीला धडकली. यात स्कुटीचालक आणि कार चालक दोघंही गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details