महाराष्ट्र

maharashtra

आमची ताकद ही काँग्रेसपेक्षा जास्त, तरीही 'इंडिया'मध्ये का नाही घेत, इम्तियाज जलील यांचा सवाल

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 10:42 PM IST

इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगरImtiaz Jaleel On Congress Party : आम्हाला पण इंडिया आघाडीत समाविष्ट करायला पाहिजे होतं, अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे. सध्या इंडिया आघाडीची बांधणी सुरू आहे. त्यात आम्हाला प्रस्ताव यायला पाहिजे होता. त्यांनी आम्हाला सोबत घेतलं तरी ठीक आणि नाही घेतलं तर अजून ठीक अशी मिस्कील टीका खासदार जलील यांनी केलीय. आमच्यावर सतत भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला जातोय. भाजपाला हरवण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली असून आम्ही देखील त्यांच्यासोबत राहू शकतो. खरंतर त्यांनीच आमच्याकडे येऊन प्रस्ताव द्यायला पाहिजे होता, सध्या काँग्रेसचा एकही खासदार महाराष्ट्रात नाही. तर आमच्या पक्षाचा एक खासदार संसदेत जातो. त्यामुळं आमची ताकद ही काँग्रेसपेक्षा जास्त आहे, असं असलं तरी आम्हाला प्रस्ताव आलेला नाही असं मत खासदार यांच्या जलील यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details