महाराष्ट्र

maharashtra

Marathwada Mukti Sangram: मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणीत स्वातंत्र्यसैनिक देवलु बाई यांचे अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 6:14 PM IST

Updated : Sep 17, 2023, 8:16 PM IST

मराठवाडा मुक्ती संग्राम

नांदेड-  Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेकांनी लढा दिलाय. त्यांना हौतात्म्य आलं आहे. भालू नाईकदेखील त्यातील एक आहेत. मराठवाडा निजाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी त्यांनीदेखील मोलाची भूमिका निभावलीय. रजाकारांनी संपूर्ण गावाला वेढा घातला होता. गावातील मंडळींनी तसेच स्वातंत्र्यसेनानी भालू राठोड यांनी पुढाकार घेत रजाकारांशी दोन हात केले. नऊ रझाकारांना बांधून ठेवून बेदम मारहाण केली. त्यानंतर गाव लुटण्यासाठी आलेल्या रझाकारांनी पळ काढला. रझाकारांशी प्रत्यक्ष दोन हात करणाऱ्या भालू राठोड यांची ही कहाणी आहे. त्यांच्या थरारनाट्य लढ्याला त्यांच्या पत्नी देवलु बाई भालू राठोड यांनी उजाळा दिलाय. त्या 115 वर्षांच्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी माझ्या पतीनं प्राणाची आहुती दिली. पण प्रशासनाच्यावतीनं आमच्या कुटुंबियाला योग्य ती आर्थिक मदत मिळत नाही. सुविधादेखील मिळत नसल्याची खंत देवलु बाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलीय.

Last Updated :Sep 17, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details