महाराष्ट्र

maharashtra

भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर गजबजलेल्या मरिन ड्राईव्ह परिसरात काय स्थिती होती? पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 10:32 AM IST

भारताचा दारुण पराभव, गजबजलेल्या मरिन ड्राईव्ह परिसरात शांतता

मुंबई Australia beat india in world cup :भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागलाय. रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. भारताच्या या पराभवानंतर, मुंबईत नेहमीच 'संडे नाईट'ला गजबजलेला असणाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरात रविवारी रात्री शांतता पाहायला मिळाली. भारतीय क्रिकेट संघावर मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी 'आता आपण हरलो आहोत. यावर आता काय बोलणार?' असं म्हणत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. दरम्यान, भारताच्या पराभवानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा बघायला मिळाली. तर काही ठिकाणी लोकांनी संतप्त होऊन भारतीय संघाविरोधात घोषणाबाजी देखील केली. 

ABOUT THE AUTHOR

...view details