महाराष्ट्र

maharashtra

Manoj Jarange Patil : राज्य सरकारला शेवटचं सांगतो...; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 6:33 PM IST

मनोज जरांगे पाटलांचा सूचक इशारा

जालना Manoj Jarange Patil : मराठा तरुणांनी आत्महत्या करू नका, शांततेत आंदोलन करा, रविवारपासून साखळी उपोषण ठिकाणी ज्यांना शक्य आहे त्यांनी आमरण उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) केले. प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. आपल्या दारात कोणत्याही राजकीय नेत्यास येऊ द्यायचे नाही आणि आपणही त्यांच्या दारात जायचे नाही. माझं दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण सुरू आहे. या दरम्यान काही झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची राहील, अशी तंबीही मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी जालना येथे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. यामुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details