महाराष्ट्र

maharashtra

Ganeshotsav : घोडपदेवमध्ये चंदेरी फुलांचा गणपती, पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 9:36 PM IST

Ganeshotsav

मुंबईGaneshotsav  : सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईत सर्वत्र धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळेस गणेश भक्तांना आपल्या गणेशोत्सव मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी गणेशोत्सव मंडळाकडून वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या आहेत. घोडपदेवमधील अष्टविनायक सेवा मंडळानं चंदेरी फुलांपासून गणेश मूर्ती तयार केली आहे. मुंबईतील घोडपदेव परिसरातील डीपी वाडी येथे गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध वस्तूंपासून तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती हे आहे. येथील डीपी वाडीमध्ये सुपारीपासून गणपती, कडधान्यांपासून गणपती, नारळापासून गणपती, सुकामेव्याचा गणपती तसेच मोत्यांचा गणपती असे विविध वस्तूंपासून गणेश मूर्ती तयार करून भाविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न डीपी वाडी गणेशोत्सव मंडळाकडून केला जातो. या ठिकाणी केदारनाथ येथे विराजमान असलेल्या गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. मंडळाचे कार्यकर्ते सिद्धेश भगत सांगतात. यंदा अष्टविनायक सेवा मंडळाने चंदेरी फुलांपासून गणेश मूर्ती तयार केली आहे. चंदेरी फुलांपासून तयार केलेली ही गणेश मूर्ती अतिशय आकर्षक दिसत असून गणपतीच्या डोक्यावर लाल रंगाचा फेटा बांधण्यात आला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details