महाराष्ट्र

maharashtra

फायनलमध्ये 'या' खेळाडूची कामगिरी ठरणार निर्णायक; माजी क्रिकेटपटू सुरेंद्र भावे यांची खास मुलाखत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 9:24 PM IST

Updated : Nov 19, 2023, 1:59 PM IST

former cricketer Surendra Bhave

पुणे : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. जगज्जेत बनण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आमनेसामने येतील. संपूर्ण जगाचं लक्ष या अंतिम सामन्याकडे लागलेलं आहे. या सामन्याबाबत माजी क्रिकेटपटू आणि २०११ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडणारे सुरेंद्र भावे यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. "फायनल मॅचमध्ये टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करावी आणि ऑस्ट्रेलियासमोर भक्कम टार्गेट उभं करावं. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईटमध्ये बॉल स्विंग होऊन याचा फायदा भारतीय गोलंदाजांना मिळू शकतो", असं ते म्हणाले. सुरेंद्र भावे यांच्या मते अंतिम सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा हा भारतीय संघाचा इम्पॅक्ट प्लेअर ठरू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची उत्कृष्ट फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग आहे. 

Last Updated :Nov 19, 2023, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details