महाराष्ट्र

maharashtra

Jalna Crime News: पाहा, जालन्यात मोबाईलवरील गेमच्या पैशांवरुन दोन गटांत फ्री स्टाईल मारहाण

By

Published : Mar 21, 2023, 10:47 AM IST

फ्री फायर गेमच्या पैशाच्या वादातून तरूणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

जालना :आजच्या तरूणाईला मोबाईलचे व्यसन लागल्याचे आपण बघत आहोत. याचाच प्रत्यय सध्या जालन्यात आला आहे. रविवारी सायंकाळी मोती बागेजवळ फ्री फायर गेममधे पैसै हरल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. यात सात तरूण जखमी झाले आहेत. यात दोन जण गंभीर असल्याची माहीती समोर येत आहे. काही जखमी तरूणांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन ते तीन जणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोबाईलचे व्यसन तरूणांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन चालले आहे. याची प्रचिती रविवारी जालन्यात आली आहे. फ्री फायर गेममधे पैसै हरल्याच्या कारणावरून जालन्यात दोन गटात आधी पासुनच वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी एका गटाने दुसऱ्या गटास मोतीबाग परिसरातील चौपाटी येथे बोलावले. मात्र, यावेळी वाद मिटण्याऐवजी वाद आणखीनच चिघळला. एका गटातील तरुणांनी दुसऱ्या गटातील तरुणांवर अचानक हल्ला चढवल्याने मोतीबाग परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. घटनेची माहीती मिळताच पोलीस आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details