महाराष्ट्र

maharashtra

Khadse On Patil : एकनाथ खडसेंकडून गुलाबराव पाटील यांच्यावर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

By

Published : Jun 19, 2023, 4:28 PM IST

एकनाथ खडसेंकडून गुलाबराव पाटलांवर अब्रू नुकसानीचा दावा

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. भाषणादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावर केल्याप्रकरणी हा अब्रूचा नुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती, एकनाथ खडसेंनी दिली आहे. तर भाषणादरम्यान गुलाबराव पाटील यांनी बेछूट आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खडसेंकडून हा दावा दाखल करण्यात आला होता. याबाबत मंत्री  गुलाबराव पाटील यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे यासंदर्भात नोटीस देखील पाठवण्यात आली होती. मात्र गुलाबराव पाटील यांनी कोणतेही आरोप सिद्ध न करून दाखवल्याने जळगाव सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्याचे, एकनाथ खडसे म्हणाले. याप्रकरणी आज जळगाव सत्र न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details