महाराष्ट्र

maharashtra

Doctor Day Special: डॉक्टर डे...ससून रुग्णालयाचे डीन स्वतः करतात शस्त्रक्रिया...पहा काय म्हणाले डॉ. संजीव ठाकूर

By

Published : Jul 1, 2023, 10:54 PM IST

डॉ. संजीव ठाकूर, ससून रुग्णालय डीन

पुणे : आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे केले जातात. कारण प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. असेच काहीसे आज म्हणजेच एक जुलैला देखील आहे. 1 जुलै या दिवशी संपूर्ण देशात 'डॉक्टर डे' म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा होतो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे रुग्णसेवेचे व्रत पार पाडले होते. डॉक्टरांची रुग्णसेवा आणि समर्पण गौरवाच्या निमित्ताने 1 जुलैला 'डॉक्टर डे' (Doctor Day Special) भारतात साजरा केला जातो. याच डॉक्टर डे निमित्त पुण्यातील शासकीय रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात जिथे राज्यातील हजारो रुग्ण या रुग्णालयात येतात. याच रुग्णालयाचे मुख्य डॉ. संजीव ठाकूर (Dr Sanjeev Thakur) हे मुख्य अधिष्ठाता असूनही शस्त्रक्रिया करतात. 5 महिन्याच्या काळात त्यांनी आतापर्यंत अवघड अश्या जवळपास 15 हून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया केली आहे. (Sassoon Hospital Dean)
याबाबत डॉ. संजीव ठाकूर म्हणाले की, जेव्हा मी जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेतली तेव्हा पासून ते आतापर्यंत जवळपास 12 रुग्णांची बेरीॲक्ट्रिक शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात आली आहे. यात 4 महिलांवर आणि आठ पुरुषांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अगदी 36 वर्षांच्या महिलेपासून ते 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. या सर्वांना लठ्ठपणासह काही ना काही आजार होता; पण त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर पूर्वी त्यांना जो त्रास होत होता तो आता होत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details