महाराष्ट्र

maharashtra

Road Scam In Jalna : जालन्यात पॉलिथिन पेपर टाकून बनवला डांबरी रोड, गुत्तेदाराचा अनोखा फंडा, नागरिक संतप्त

By

Published : Jun 2, 2023, 9:20 AM IST

पॉलिथिन पेपर टाकून बनवला डांबरी रोड

जालना :पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून डांबरी रोड बनवताना गुत्तेदाराने पॉलिथिन पेपर टाकून रोड बनवल्याचे उघड झाले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली. हस्त पोखरी ते कर्जत या मार्गावर हा डांबरी रोड करण्यात आला असून ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर हा रोड पॉलिथिन पेपरमुळे जागोजागी उखडल्याचे दिसून आले. पॉलिथिन पेपर टाकून डांबरी रोड करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून नागरिकांनी बनवलेला व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. 

हस्त पोखरी कर्जत या रस्त्याच्या कामाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली. सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या रस्त्याच्या कामात गुत्तेदारांने चक्क डांबराच्या थराच्या खाली पॉलिथिन पन्नीचा वापर करून त्यावर डांबरीकरण केल्याचे ग्रामस्थांनी उघड केले. डांबराच्या थराखालील पॉलिथिन पन्नी पकडल्यानंतर डांबराचा थर अक्षरशः पन्नीसह उचकटून येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला आहे. त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत दर्जाहीन काम होत असल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषी गुत्तेदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उद्धव घुगे, अशोक चाटे, अशोक वाघ, अक्षय वाघ, माणिक बोंगाणे, माधव आव्हाड, सुशील घुगे, परमेश्वर रसाळ, राहुल कातुरे, प्रकाश वायभट, ज्ञानेश्वर घुगे,बाळू नरवडे, विलास चोरमले, ज्ञानेश्वर शिंदे, शरद आव्हाड, गोरख रसाळ, एकनाथ घोडके, प्रल्हाद घोडके, किशोर सोलाट, विष्णू राखुंडे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी या रोडच्या कामाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details