महाराष्ट्र

maharashtra

Attack On Forest Officer : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महिला वन अधिकाऱ्यावर हल्ला

By

Published : Jul 23, 2023, 10:32 PM IST

महिला वन अधिकाऱ्यावर हल्ला

नाशिक :सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील जागेवर अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर स्थानिक नागरिकांनी हल्ला केला. या घटनेत महिला अधिकाऱ्यासह एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील चोंडी परिसरात वनविभागाचे क्षेत्र आहे. याबाबतची माहिती सिन्नर वनविभागाला मिळताच त्यांनी या लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या. मात्र नागरिकांनी अतिक्रमण काढले नसल्याने आज वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानंतर संतप्त होऊन स्थानिक महिलांनी हातात चाकू घेऊन वनविभागाच्या पथकावर हल्ला केला. या घटनेत महिला वनरक्षक केंगे, वनमजूर शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, सिन्नर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details