महाराष्ट्र

maharashtra

Jyeshtha Gauri Pujan : साताऱ्यात पवार कुटुंबीयांनी साकारले गौराईसमोर 'अष्टविनायक देखावा'

By

Published : Sep 5, 2022, 10:49 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

सातारा - दोन वर्षांनंतर यंदाचा गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) कोरोनामुक्त वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीसमोर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक देखावे ( Ashtavinayaka Darshan Scene ) सादर करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सातार्‍यातील गौरी पवार आणि प्रांजली पवार या सख्ख्या जाऊबाईंनी आपल्या घरगुती गणपतीसमोर पर्यावरणपूरक असा अष्टविनायक दर्शनाचा भव्य देखावा साकारला ( Attractive Decoration Of Gaurai ) आहे. कागद, भाताच्या काड्या आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून गणपतीसमोर अष्टविनायकाची कमान उभारली आहे. तसेच गौराईला देखील पारंपारिक पध्दतीने दागिन्यांचा साज चढवला आहे. आकर्षक रांगोळी, फुलांची आरास आणि मिठाईच्या फराळाने गौराईचे माहेरपण केले आहे. मागील दोन वर्षे सार्वजनिक आणि घरगुती गणपतीवर कोरोना निर्बंधाचे सावट होते. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. गौराईची गाणी म्हणत झिम्मा-फुगड्या खेळून महिलांनी घरोघरी गौरीची प्रतिष्ठापना केली आहे. रात्री उशीरापर्यंत शहरी तसेच ग्रामीण भागात महिला एकत्र येऊन फेर धरून गौराईची गाणी गात झिम्मा-फुगड्यांचा फेर धरताना दिसत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details