महाराष्ट्र

maharashtra

Action Against Sand Mafia: पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची वाळू माफियांवर कारवाई; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 11:05 PM IST

दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

बीडAction Against Sand Mafia: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. आज वाळू माफियांकडून वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार तात्काळ बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाने वाहनांवर (Beed District Superintendent of Police) कारवाई केली असून 6 ट्रॅक्टर, 7 केन्या, 4 दुचाकी, 300 ब्रास वाळू असा एक ते दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चार आरोपी ताब्यात घेतले आहे. बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करताना पाहायला मिळत आहे. अनेक वेळा अशा कारवाया करून देखील अवैध वाळू उपसा करणारे मात्र न भीता वाळू उपसा चालूच ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे. (Illegal extraction of sand in Godavari riverbed) वाळू माफियांनी अनेक निष्पाप लोकांचे बळी देखील घेतले आहेत. त्यांच्या वाहनांवर कारवाई  करून देखील वाहन चालक मात्र कारवाईला भीत नाहीत. या अगोदर चक्क जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारल्याचे आपण प्रसार माध्यमातून पाहिलं आहे. पोलीस कारवाई करून देखील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना कुणाचाही धाक राहिला नाही असं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज ही कारवाही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गणेश मुंडे, विष्णू वायबसे, स्वाती मुंडे व पथकातील टीमने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details