महाराष्ट्र

maharashtra

Video : रामनगर साखर कारखाना येथे दोन गटात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, एक जखमी

By

Published : Mar 3, 2022, 1:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

जालना : जालना तालुक्यातील रामनगर ( Ramnagar Sugar Factory ) परिसरात शिवसेना कार्यकर्ता शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी यांच्यात रात्री रोडवर बॅनर लावण्याचा कारणावरून वाद झाला होता. त्या वादच रूपांतर सकाळी मोठ्या वादात होऊन दोन्ही गट आमने सामने आल्याने मोठा वाद झाला. या वादात रमेश जोशी यांनी शेजुळ गटाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची ( shootout between two groups at Ramnagar ) प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात एक जण जखमी गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावर निर्माण झाले आहे. बॅनर लावण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री जोशी यांनी बॅनर लावण्यास विरोध केल्याने, शिवसेनेच्या चार ते पाच गावातील जमाव जोशी यांच्याकडे चालून आल्याने या दोन गटात वाद झाला. या वादात जोशी गटाच्या गणेश जोशी यांनी गोळीबार केल्याने ( Ganesh Joshi shooting ) विजय ढेगळे हा 22 वर्षीय तरुण पोटात गोळी लागल्याने जखमी झाला. त्याला पोलिसांनी तात्काळ जालन्यातील संजीवनी हॉस्पिटल मध्ये उपचरासाठी दाखल केल्याची माहिती मोजपुरी पोलिसांनी दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Last Updated :Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details