महाराष्ट्र

maharashtra

food Video आज आपण तयार करणार आहोत व्हेजी ग्रील्ड सॅंडविच, बनवायला सोप्पे आणि खायला चटपटीत

By

Published : Aug 17, 2022, 7:42 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

आज आपण बघणार आहोत, व्हेजी ग्रील्ड सॅंडविच Veggie Grilled Sandwich रेसीपी. बनवायला सोप्पे आणि खायला चटपटीत easy to make and quick to eat आहे. यासाठी लागणारे साहीत्य आहे. उकळुन सोललेले बटाटे Potatoes 3 ते 4 वाटी, बारीक चिरलेले कांदे Onions 3 ते 4 वाटी, बारीक चिरलेली शिमला मिरची Capsicum 1 ते 2 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर Coriander 1 ते 2 वाटी, गरम मसाला अर्धा चमच्च,तिखट अर्धा चमच्च, भाजलेली जिरेपूड अर्धा चमच्च, मीठ 1 चमच्च,हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करुन घ्या. त्यानंतर एक वाटी कोथिंबीर, एक वाटी पुदिना पाने, 1 ते 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, एक चमच्च लिंबाचा रस, 1 चमच्च काळे मीठ, अर्धा चमच्च साखर या सगळ्यांची मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करुन घ्या. व ती हिरवी चटणी एका बाऊल मध्ये काढुन घ्या. चार ब्रेड घ्या. त्याचे कोपरे कापुन घ्या. ब्रेडवर बटर लावा. त्यावर तयार केलेली हिरवी चटणी लावा. त्यावर तयार केलेला बटाट्याचा मसाला लावा. तसेच, काकडीचे काप, काळे मीठ, टोमॅटो व कांद्याचे काप आणि चाट मसाला टाका. त्यानंतर 6 ते 8 मिनीटे ते सॅंडविच ग्रील्ड करा. तुमचे व्हेजी ग्रील्ड सॅंडविच तयार. तुम्ही याला साॅस किंवा हिरव्या चटणीसह खाऊ शकता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details