महाराष्ट्र

maharashtra

Video : वाढत्या तापमानामुळे 3 घराला आग लागून गॅसचा स्फोट; तिन्ही घरं जळून खाक

By

Published : Apr 6, 2022, 10:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात, सावरकर प्लॉटमध्ये ( Savarkar plot fire Incident ) राहणाऱ्या सलीम खान पठाण यांच्या घराला लागल्याची घटना घडली आहे. ही आग वाढत्या तापमानामुळे लागली असून, आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर त्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट ( Gas cylinder Explosion ) झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे या घराच्या बाजूला असणारे शाहिदाबी नूर खान, अताउल्ला खान यांच्याही घराला आग लागली. ज्यामुळे तीनही घरं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या आगीत घर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Last Updated :Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details