महाराष्ट्र

maharashtra

रायगडमध्ये उत्साहात गौरी-गणपतीचे विसर्जन

By

Published : Sep 14, 2021, 9:02 PM IST

पेण (रायगड) - मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील धार्मिक सणांना कोरोनाचे नियम लागू असल्याने यावर्षीचा गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, हा गणेशोत्सव साध्या पध्दतीने जरी साजरा करण्यात आला असला तरी घरामध्ये आलेल्या गौराईचे आणि पाच दिवसांच्या बाप्पाचे आज आनंदी वातावरणात आणि बाप्पाच्या जयघोषाने विसर्जन करण्यात आले. तालुक्यात 6026 खाजगी आणि 7 सार्वजनिक तर 1663 गौराईचे आज (मंगळवारी) विसर्जन करण्यात आले. मात्र दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत मिरवणुकीच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देण्याच्या प्रथेमध्ये गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खंड पडला आहे, तरी गणेश भक्तांनी अगदी आनंदी वातावरणात आणि टाळ वाजवत पाच दिवसांच्या बाप्पाला जयघोषात निरोप दिला. पेण पोलीस स्टेशन, दादर सागरी पोलीस स्टेशन, वडखळ पोलिसांनी सर्व विसर्जन घाटांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. पावसाचे वाढते प्रमाण पाहता नदीच्या विसर्जन ठिकाणी 25 स्वीमर तैनात ठेवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details